बांधकाम कामगार भांडी संच योजना ; ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया.
कामगारांसाठी अत्यावश्यक वस्तूंचा संच
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने कामगारांसाठी अत्यावश्यक वस्तूंचा संच (Essential Kit) वितरित करण्याची एक नवीन योजना सुरू केली आहे. या संचामध्ये एकूण १० महत्त्वाच्या वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूंच्या संचासाठी ऑनलाईन अर्ज किंवा अपॉइंटमेंट (नियुक्ती) कशी घ्यायची, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.
अत्यावश्यक संचात समाविष्ट असलेल्या १० वस्तू
या योजनेंतर्गत कामगारांना खालील अत्यावश्यक वस्तूंचा संच दिला जातो:
१. पत्र्याची पेटी
२. प्लॅस्टिकची स्टूल
३. धान्य साठवणची कोठी (एक नग)
४. किलो क्षमतेची कोठी (एक नग)
५. बेडशीट
६. चादर
७. ब्लँकेट
८. साखर ठेवण्यासाठी डबा
९. चहा पावडर ठेवण्यासाठी डबा
१०. वॉटर प्युरिफायर (१८ लिटर क्षमतेचा)
१० वस्तूंसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया.
१.कामगार नोंदणी क्रमांक (BOCW Registration Number) मिळवा:
सर्वात आधी, तुम्हाला तुमचा कामगार नोंदणी क्रमांक आवश्यक आहे.
हा क्रमांक मिळवण्यासाठी Google वर “महा बीओ सीडब्ल्यू प्रोफाईल लॉगिन” (Maha BOCW Profile Login) असे शोधा आणि पहिल्या लिंकवर क्लिक करा.
येथे तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून ‘Proceed’ वर क्लिक करा.
मोबाईलवर आलेला ओटीपी (OTP) टाकून लॉगिन करा.
लॉगिन झाल्यावर, तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसेल, तो क्रमांक कॉपी करून घ्या.
२.अत्यावश्यक किटसाठी अर्ज करा:
आता अत्यावश्यक किट वितरणाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
कॉपी केलेला तुमचा नोंदणी क्रमांक येथे टाका.
मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून ‘Verify OTP’ वर क्लिक करा.
स्क्रीनवर तुमची वैयक्तिक माहिती दिसेल.
३.शिबिर आणि तारीख निवडा:
पेजवर खाली स्क्रोल करून ‘शिबिर निवडा’ (Select Camp) या पर्यायावर क्लिक करा.
तुमच्या सोयीनुसार, जिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेले जवळचे शिबिर निवडा.
शिबिर निवडल्यानंतर ‘अपॉईटमेंट डेट’ (Appointment Date) वर क्लिक करा.
तुमच्या जिल्ह्यात कोटा (Quota) उपलब्ध असल्यास, तुम्हाला तारखा दिसतील. (कोटा उपलब्ध नसल्यास, १५ दिवसांनी पुन्हा प्रयत्न करावा.)
उपलब्ध तारखांमधून तुम्हाला हवी असलेली तारीख निवडा.
४.अपॉइंटमेंटची प्रिंट काढा:
तारीख निवडल्यावर ‘अपॉईटमेंट प्रिंट करा’ या पर्यायावर क्लिक करा.
तुमची अपॉइंटमेंटची पावती (प्रिंट) स्क्रीनवर दिसेल. याची प्रिंट काढून घ्या किंवा स्क्रीनशॉट जपून ठेवा.
वस्तूंचा संच कधी आणि कुठे मिळेल?
तुम्ही निवडलेल्या तारखेला, तुमच्या पावतीवर (प्रिंटवर) दिलेल्या शिबिराच्या पत्त्यावर आपले आधार कार्ड आणि ही अपॉइंटमेंट पावती घेऊन जा. त्या ठिकाणी तुम्हाला १० वस्तूंचा अत्यावश्यक संच वितरित केला जाईल.