अनुदान वाटपास विलंब ; आचारसंहितेमुळे अतीव्रुष्टी अनुदान वाटप थांंबनार का पहा.
मित्रांनो, सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे अनेक ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये एक मोठी अफवा पसरवली जात आहे की आचारसंहिता लागू झाल्यामुळे अतिवृष्टी आणि रब्बी पिकांसाठीचे अनुदान आता मिळणार नाही किंवा त्याचे वितरण थांबवले जाईल. त्यामुळे नुकसानभरपाई कधी मिळणार याबद्दल शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संदर्भात, निवडणुकीच्या आचारसंहितेबाबत निवडणूक आयोगाचे नियम अत्यंत स्पष्ट आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान आणि त्यासाठी शासनाकडून दिली जाणारी मदत किंवा अनुदान हे आचारसंहितेच्या कक्षेबाहेर ठेवले जाते. नैसर्गिक आपत्तीसाठी दिलं जाणारं अनुदान हे कोणत्याही राजकीय फायद्यासाठी नसून, ते नागरिकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक असलेली उपाययोजना असते. त्यामुळे, नैसर्गिक आपत्तीबाबत मदत देण्यासाठी आचारसंहिता कोणत्याही प्रकारची अडकाठी आणत नाही.












