Gram fertilizer management ; हि खतं टाका..हरबरा उत्पादन वाढेल दुप्पट.
Gram fertilizer management ; हरभरा खत व्यवस्थापन गजानन जाधव यांचे ; हरभरा पिकासाठी खत व्यवस्थापन करताना जमिनीच्या प्रकारानुसार खताची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण एकाच खताचा ग्रेड सर्व प्रकारच्या जमिनीसाठी योग्य नसतो. हरभऱ्याच्या मुळांवर नत्र स्थिर करणाऱ्या गाठी (Nodules) असतात. हे गाठी हवेतील नत्र शोषून पिकाला पुरवतात. त्यामुळे इतर पिकांप्रमाणे हरभऱ्याला बाहेरील नत्राची (युरियाची) गरज फार कमी असते. परिणामी, हरभऱ्याच्या पेरणीसोबत युरिया देण्याची आवश्यकता नसते. खताची निवड करताना आपल्या जमिनीतील नत्राचे प्रमाण किती आहे हे पाहून त्यानुसार निर्णय घेणे अधिक फायदेशीर ठरते.
भारी आणि मध्यम जमिनीसाठी खत नियोजन.
ज्या जमिनी एकदम भारी आहेत आणि जिथे हरभऱ्याची वाढ दरवर्षी खूप जास्त होते, अशा जमिनीत पिकाला नत्र देण्याची गरज नसते. त्यामुळे अशा जमिनीसाठी फक्त सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) चा वापर करावा. पेरणीपूर्वी किंवा पेरणीसोबत २ ते ३ बॅग सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर पुरेसा ठरतो.












