Rabbi pikvima yojana 2025 ; अर्ज प्रक्रिया सुरू, हि आहे शेवटची तारीख.
Rabbi pikvima yojana 2025 ; रब्बी हंगामासाठी एकूण सहा प्रमुख पिकांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. यात रबी ज्वारी (जिरायत आणि बागायत), गहू (जिरायत आणि बागायत), हरभरा, रब्बी कांदा, उन्हाळी भुईमूग आणि उन्हाळी धान यांचा समावेश आहे. या पिकांसाठी अर्ज करण्याची मुदत वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. रबी ज्वारीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२५ आहे.
हरभरा, गहू आणि रब्बी कांदा या पिकांसाठी १५ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. तर, उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमूग या दोन पिकांसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. शेतकऱ्यांनी नमूद केलेल्या विहित मुदतीत या योजनेत सहभागी होणे आवश्यक आहे.












